प्रत्येक कोर्स अगदी सोप्या आणि सहज समजणाऱ्या भाषेत तयार केला आहे. तंत्रज्ञानाचा कोणताही पूर्व-अनुभव नसलेले शिक्षकही हे कोर्स सहजपणे पूर्ण करू शकतात. प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला मार्गदर्शन (Step-by-Step Guidance) मिळेल. आपल्या ज्ञानात भर घालणारा व ज्ञान वृधी करणारा अनुभव.
आम्ही फक्त थेअरी शिकवत नाही, तर प्रत्येक गोष्ट प्रत्यक्ष कशी करायची हे करून दाखवतो. यामुळे तुम्हाला Canva डिझाइन बनवणे, व्हिडिओ एडिट करणे किंवा ब्लॉग लिहिणे यांसारखी कौशल्ये लगेच वापरता येतील. प्रत्येक घटकाचे प्रत्यक्षिक दाखवून सराव करून घेतो.
हे सर्व कोर्सेस अशा तज्ज्ञांनी तयार केले आहेत ज्यांना शिक्षण आणि तंत्रज्ञान या दोन्ही क्षेत्रांत कामाचा अनुभव आहे. त्यांच्या अनुभवाचा तुम्हाला थेट फायदा मिळेल.
तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि वेळेनुसार कधीही, कोठूनही हे कोर्सेस पूर्ण करू शकता. व्हिडिओ रेकॉर्ड केलेले असल्यामुळे तुम्हाला वेळेचे कोणतेही बंधन नाही. Online आणि Offline शिकण्याची सोय आपणास आम्ही उपल्बध करून देतो.
कोर्स करत असताना तुम्हाला येणाऱ्या शंका आणि अडचणी सोडवण्यासाठी आम्ही नियमितपणे लाईव्ह सत्रे आयोजित करतो, जिथे तुम्ही थेट प्रशिक्षकांशी संवाद साधू शकता. सोबतच आपल्या App वरती Chat Support उपल्बध करून दिलेला आहे.
तुम्हाला एक विशेष व्हॉट्सॲप किंवा फेसबुक ग्रुपमध्ये सामील केले जाईल, जिथे तुम्ही इतर शिक्षकांशी संवाद साधू शकता, तुमच्या कल्पना शेअर करू शकता आणि एकमेकांकडून शिकू शकता.
वेगवेगळ्या घटकावर आधारीत तज्ञ मार्गदर्शाकामार्फत नियमित तासिका आयोजन.
अध्ययन सुविधा
आपण गेत असलेल्या तासिका आपण आपल्या उपल्बध वेळेनुसार पूर्ण करू शकता रोकॉर्डिंग सुविधा उपल्बध करून दिली जाते.
प्रत्येक महिन्याला विशेष तासिका व बॅचेस घेतल्या जातात त्यात विशेष मार्गदर्शन केले जाते.
Get access to regular online practice tests for various subjects and courses.